शिर्डीतील साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आज पंतप्रधान मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटात आहे आणि या संकटाच्या काळात केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करणार अशी घोषणा आज पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधान पीकविमा योजनेतून राज्याला तातडीने मदत करणार असल्यांचं आश्वासनही पंतप्रधानांनी शिर्डीत दिले आहे.
शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे, तसेच यावेळी पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे वाटप करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते 10 जणांना प्रातिनिधीक स्वरुपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे, यावेळी मोदींनी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मराठीतून संवाद साधला आहे.
शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध उपक्रमांचं भूमिपूजन केलं, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला, दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राकडून मदत मिळेल अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर व्यक्त केली.
शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिलांना घरांच्या चाव्यांचं वाटप केलं, यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना 2019 पर्यंत घरं उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं आहे.
मोदींनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घरं उपलब्ध करुन देण्याचं सांगितल आहे, पण महाराष्ट्रात 2019 पर्यंतच घरं उपलब्ध करुन देण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.