नालासोपाऱ्यात नायजेरियन नागरिककडून अमली पदार्थ जप्त

नालासोपाऱ्यात नायजेरियन नागरिककडून अमली पदार्थ जप्त

नालासोपाराच्या शहरातील पूर्वेकडील परिसरात बुधवारी रात्री ५८ लाख ७४ हजारांचे अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. तुळींज पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

तुळींजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल यांना प्रगतीनगर येथील जीवदानी हॉलच्या बाजूला अमली पदार्थ विक्री करण्यासाठी परदेशी नागरिक येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, प्रगतीनगर येथील जीवदानी हॉलच्या बाजूला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि पोलिस अंमलदारांनी सापळा लावला असता त्याचवेळी एक नायजेरियन तेथून पळू लागल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली.

आरोपीकडे १०२.४०० ग्रॅम वजनाचा १० लाख २४ हजार रुपये किमतीचा एमडी अमली पदार्थ मिळाला, तसेच त्याच्या घराची झडती घेतल्यावर १७ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचा १७१.२५० ग्रॅम कोकेन आणि 39 लाख २८ हजार ३०० रुपये किमतीचे २२३.४५ ग्रॅम एमडी, एमए अमली पदार्थ मिळून आल्याने जप्त केला आहे. ईदे इम्यानूवेल ईदे पॉल असे आरोपी नायजेरियनचे नाव आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version