राणेंच्या स्वाभिमानीचा राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा!

राणेंच्या स्वाभिमानीचा राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा!

 

भाजपकडून राज्यसभेवर नारायण राणे यांची वर्णी लागलीय. भाजपनं नारायण राणे यांना खासदार करून दोन दिवस होत नाही तोच राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं त्यांच्याशी स्थानिक निवडणूकांमध्ये काडीमोड घेऊन राष्ट्रवादी काँगेसशी घरोबा केलाय. याला निमीत्त ठरलंय ती कणकवली नगरपंचायतीची निवडणुक राणेंच्या सोबत असलेले संदेश पारकर आणि राजन तेली यांनी सध्या भाजपबरोबर चूल मांडलीय. आपल्याला सोडून गेल्यामुळे राणेंना या दोघांवर राग आहे. शिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि राणेंचे धाकटे चिरंजीव आणि आमदार नितेश यांच्यातून विस्तव जात नाही. वैयक्तिक राग लोभाचा फटका यामुळे भाजप आणि स्वाभिमानी आघाडीला बसलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version