शिवसेनेचा विरोध असता तरी 100 टक्के मीच निवडून आलो असतो – नारायण राणे

शिवसेनेचा विरोध असता तरी 100 टक्के मीच निवडून आलो असतो – नारायण राणे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर भाजपने नारायण राणेंचा पत्ता कट केला आणि प्रसाद लाड यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली. माझ्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र येणं हाच विजय असल्याचं नारायण राणे म्हणाले. भाजपकडून मला संधी मिळाली असती तर शिवसेनेची

मतं फुटली असती. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतरही विधानपरिषदेची पोटनिवडणूक मी जिंकलो असतो असा विश्वास राणेंनी बोलून दाखवला. भाजपचा निर्णय मान्य असल्याचंही राणे म्हणाले.

काल रात्री मुख्यमंत्री आणि माझी बैठक वर्षावर झाली. त्यावेळी भाजपची भूमिका त्यांनी मला सांगितली आणि मला ती पटली त्यामुळे मी ही निवडणूक लढवत नाही.

नारायण राणेंसारखे शिवसेनेत शिवसैनिक होते म्हणून आज शिवसेना टिकलेय. उध्दव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीकाही राणेनीं केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version