सेनेवर प्रहार करत नारायण राणेंची पक्ष स्थापना

सेनेवर प्रहार करत नारायण राणेंची पक्ष स्थापना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, तेथेही त्यांची घुसमट झाली. परिणामी राणे नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका करत पक्षाचा राजीनामा दिला.

 

राजीनाम्यानंतर राणे नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पार्श्वभूमिवर रविवारी नारायण राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

 

या पत्रकार परिषदेत राणेंनी सेनेवर जोरदार टिकास्त्र सोडले. आणि आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली.

 

‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष‘ असे पक्षाचे नाव राणेंची या पत्रकार परिषदेत घोषित केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत राणेंनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 

काय म्हणाले नारायण राणे?

 

शिवसेनेत उद्धव ठाकरे सोडून सगळेच मित्र

कॉंग्रेसमध्ये अशोक चव्हाण सोडून सगळेच मित्र

महागाईसाठी रस्त्यावर येतात मग सेनेचे खासदार संसदेत शांत का?

शिवसेना कायमस्वरुपी प्रतिस्पर्धी

मनसे केवळ प्रसारमाध्यमांमुळे जिवंत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version