नारायण राणे घेणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांची भेट

नारायण राणे घेणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांची भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे दिल्लीत पोहोचले आहेत.

 

नारायण राणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत. तर, दुसरीकडे दिल्लीतच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तालकटोरा स्टेडियममध्ये सुरु आहे.

 

या बैठकीला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष उपस्थित आहेत. बैठकीचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने समारोप होणार आहे.

 

ही बैठक संपल्यानंतर राणे हे अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित असतील. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version