मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे – नारायण राणे

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे – नारायण राणे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मांडली आहे. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत मराठा मोर्चाबाबत आपली

भूमिका स्पष्ट केली.

 

उद्या सकाळी 11 वाजता भायखळा येथील राणी बाग या ठिकाणाहून मराठा मोर्चाची सुरवात होणार आहे. या मोर्चाची मुख्य मागणी आरक्षण ही आहे. 

 

शिक्षणात आणि नोकरीत प्राधान्य मिळावं अशा मागण्या मराठा समाजाच्या असल्याचे राणे म्हणाले.

 

उद्या मोर्चा नंतर शिष्ठमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. 20 ते 25 लाख लोक यात सहभागी होतील असा अंदाज राणे यांनी वर्तवला आहे. 

 

उद्या कोणाचे भाषण होणार नाही. मात्र, सर्व नेते यात सहभागी असतील असे राणेंनी स्पष्ट केले.   

 

मराठा समाजाचा उद्याचा मोर्चा भव्य असेल असेही नारायण राणे म्हणाले.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version