Nanded Crime: रेल्वेत नोकरी, आईवर संशय अन् रोज बाहेरचं जेवण… असं काय घडलं की मुलाने जन्मदात्रीलाच संपवलं? नंतर स्वतःचाही घेतला जीव

नांदेडमध्ये 26 वर्षीय प्रतीकने आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याची घटना घडली. आईच्या मृत्यूनंतर त्यानेही गळफास घेतला. अवघ्या आठ दिवसांत तो रेल्वे सेवेत रुजू होणार होता.
Nanded Crime: रेल्वेत नोकरी, आईवर संशय अन् रोज बाहेरचं जेवण… असं काय घडलं की मुलाने जन्मदात्रीलाच संपवलं? नंतर स्वतःचाही घेतला जीव

नांदेड: नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. 26 वर्षीय प्रतीकने आपल्या आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याची माहिती समोर आली असून या घटनेत तिचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रतीकनेही गळफास घेऊन जीवन संपवल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आईसोबत वारंवार वाद होत असल्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक आणि त्याच्या आईमध्ये काही काळापासून घरगुती कारणांवरून वाद होत होते. आई आपल्याला जेवणातून औषध देत असल्याचा संशय प्रतीकला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. याच कारणावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असल्याचेही सांगण्यात आले. शनिवारी रात्री घरातील दरवाजे आणि खिडक्या बंद करून प्रतीकने आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याचे सांगितले जाते. गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळाने प्रतीकने आईच्या साडीचा वापर करून दुसऱ्या खोलीत गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा: Amravati Crime: अमरावतीत निलंबित तलाठ्याच्या घरावर रात्री गोळीबार; दोन गोळ्या भिंतीवर आदळल्या, कुटुंबीय…

रेल्वेची नोकरी मिळाली होती

प्रतीकने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते आणि मागील काही काळापासून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याने रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि अवघ्या आठ दिवसांनी तो नव्या नोकरीत रुजू होणार होता. मात्र, त्यापूर्वीच घडलेल्या या घटनेने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार, प्रतीकच्या वडिलांवरही त्याने यापूर्वी चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे वडील सीआरपीएफमध्ये कार्यरत असून सध्या कर्तव्यावर आहेत. त्याची बहीण पुण्यात शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

मानसिक उपचार सुरू असल्याची माहिती

प्रतीकवर मानसिक आरोग्याशी संबंधित उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी काही औषधेही सुरू होती. मात्र, आपण मानसिक आजारी नसल्याचे तो वारंवार सांगत असल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. आई औषध जेवणातून देत असल्याच्या संशयामुळे तो घरी जेवण टाळून ऑनलाइन जेवण मागवत असल्याचेही सांगण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version