हजारोंच्या पंगतीला भाजी आणि भाकरी

हजारोंच्या पंगतीला  भाजी आणि भाकरी

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

हजारोंच्या संखेत पंगत बसलीय आणि जेवायला काय तर भाजी आणि भाकरी. तुमचा विश्वास नाही बसत नाहीय ना.  नांदेडच्या तामसा इथल्या यादवकालीन बाराज्योतिर्लिंग मंदिराची ही अनोखी परंपरा आहे. मकरसंक्रांतीच्या दुस-या दिवशी इथे यात्रा भरते. या पंगतीत मेनू असतो भाजी आणि भाकरीचा.

सुमारे दीडशे वर्षांपासून भाजी-भाकरीची पंगत इथे बसते. सव्वाशे क्विंटल भाजी अन अडीचशे क्विंटलच्या भाकऱ्या भाविकांसाठी केल्या जातात. ही एक दिवसाची यात्रा असून राज्यभरातल्या हजारो भाविकांसह तेलंगण, कर्नाटक मधलेही भाविक बारा ज्योतीर्लिंगाचे दर्शन करून भाजी-भाकरीचा आस्वाद घेतात.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version