तुमची पण कोणाशी जीवाला जीव देणारी मैत्री असेल तर सावधान…

तुमची पण कोणाशी जीवाला जीव देणारी मैत्री असेल तर सावधान…

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

जीवाला जीव देणारी मैत्री काही वेळा जीवावर बेतू शकते याचं उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळालंय.

”आपण इसीसचे कार्यकर्ते आहोत आणि मला अटक करा” असा मेल नांदेडच्या पोलीस अधिक्षकांना आला. त्या मेलखाली एक नंबरही देण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेन आणि स्थानिक पोलीसांनी त्या ईमेल पाठवणाऱ्यांच्या मागावर लागले. तो नंबर ट्रेस केल्यानंतर जालनातील मोहमद खाननं चक्क आपल्या मित्राला अद्दल घडावी ह्या हेतून तो मेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

काही दिवसापूर्वी मोहम्मदचं त्याच्या मित्रासोबत वाद झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्यानं हा प्रकार केल्याचं चौकशीदरम्यानं उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद खानवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version