पित्याच्या आत्महत्येला खचून न जाता, परिक्षा देण्याचा मुलीचा निर्णय

पित्याच्या आत्महत्येला खचून न जाता, परिक्षा देण्याचा मुलीचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

नांदेडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडलीय आहे. यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याच वृत्त समोर आलं आहे. नांदेडमध्ये एका अल्पभूधारक शेतकऱ्याने नापीक जमीन आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विषप्राशन करून आपले जीवन संपवले आहे.

वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली. रमेश शेटे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच नावं असून, रमेश शेटे हे नांदेड जिल्ह्यातील जुनालोहा येथील माजी नगरसेवक होते.

रमेश शेटे यांची मुलगी यंदाच्या वर्षी बारावीच्या वर्षात शिकत आहे. त्यात बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना आपल्या वडिलांच्या या कृत्यामुळे ती अक्षरशा हेलावून गेली होती. तरीही या दु:खा वर मात देत खचून न जाता त्यांच्या मृत शेतकऱ्याच्या मुलीने बारावीची परिक्षा दिली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version