विद्यार्थ्यांना पोलिसांचा पाठिंबा; परिक्षा हॉलमध्ये खुलेआम कॉपी

विद्यार्थ्यांना पोलिसांचा पाठिंबा; परिक्षा हॉलमध्ये खुलेआम कॉपी

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

कंधार तालुक्यातील चिखली येथील गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परिक्षेदरम्यान, कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट असल्याचे वृत्त समोर आले आहे. या विद्यालयात परीक्षा हॉलमध्ये 100 % कॉपी सुरु असते. गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय हे आमदार प्रतापराव चिखलीकरांचे आहे.

या ठिकाणी ऐन परिक्षेच्या वेळी कॉप्या पुरवल्या जात आहेत. यामध्ये पोलिसांचा मोठा हात असल्याचे समोर येत आहे. पोलीस अधिकारी चिठ्ठ्या पुरवल्याचे स्वत:हून कबूलदेखील करत आहे. याचा व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती लागला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version