नाणार प्रकल्पाविरोधात मनसे आक्रमक,कार्यालयाची केली तोडफोड

नाणार प्रकल्पाविरोधात मनसे आक्रमक,कार्यालयाची केली तोडफोड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नाणार प्रकल्पाविरोधात मनसे आक्रमक झालीय. मनसेनं नाणार प्रकल्पाच्या कार्यालयाची तोडफोड केलीय. मुंबीतील ताडदेव परिसरात हे कार्यालय आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हे कार्यालय फोडलंय.

नाणार प्रकल्पाविरोधात नाणार ग्रामस्थांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी नाणार प्रकल्पाला आपला विरोधच असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

आणि गरज पडल्यास नाणार प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेऊ असा इशाराही दिला होता. त्यानुसार मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. आणि त्यांनी थेट नाणार कार्यालयावर हल्ला चढवलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version