“सेल्फी काढून खड्डे दाखवण्यापेक्षा बुजवायला सुरुवात करूया” ; नाना पाटेकरांचं आवाहन

“सेल्फी काढून खड्डे दाखवण्यापेक्षा बुजवायला सुरुवात करूया” ; नाना पाटेकरांचं आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यात कोल्हापुरात मुक्त संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नानांनी नागरिक म्हणून काही जबाबदाऱ्या स्वतःहून पाळण्याची गरज व्यक्त केली.

फक्त सेल्फी काढून खड्डे दाखवण्यापेक्षा तो खड्डा बुजवायला सुरवात करूया असे आवाहन नानांनी केलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही राजकीय पक्ष उलटंच वागत आल्याचा त्यांनी आरोप केला.

शेतकरी एकत्र आला तर अडचण होईल म्हणून राजकीय पक्ष  वेळोवेळी शेतकऱ्यांचे संघटन मोडीत काढण्यात धन्यता मानत असल्याची टीका नानांनी केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version