नाना- तनुश्री वाद: गृहराज्यमंत्री केसरकरांचा नाना पाटेकरच्या पाठीशी

नाना- तनुश्री वाद: गृहराज्यमंत्री केसरकरांचा नाना पाटेकरच्या पाठीशी

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यात सुरू असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमध्ये तर दोन गट पडलेच आहेत. मात्र आता या वादात राजकारण्यांनीही उडी टाकली आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वादात नानांची बाजू घेतली आहे आणि तनूश्रीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तनुश्रीचे आरोप खरे असल्यास तिने थेट एफआयआर दाखल करावा असं केसरकरांनी म्हटलं आहे.

तनुश्रीने एका मुलाखतीत दहा वर्षांपूर्वी एका सिनेमात आयटम सॉंगच्या शुटिंगदरम्यान नाना पाटेकरांनी आपल्याशी गैरवर्तन केलं असल्याचा आरोप केला. यावर केसरकरांनी तनुश्रीकडे जर काही पुरावे असल्यास तिने ते सादर करावे, असं केसरकर यांनी म्हटलं. “कायदा प्रत्येकालाच सारखा आहे. या प्रकरणात नाना दोषी असतील तर नानांना माफ केले जाणार नाही.” असे केसरकर म्हणाले. मात्र तनुश्री कायदा न वापरता मीडियासमोर काहीही बेताल वक्तव्य करत आहे, असं केसरकरांनी म्हटलं.

“नाना हे इंडस्ट्रीत खूप जूने कलाकार आहेत. त्यांना मी खूप जवळून ओळखतो. नानांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात सुध्दा दिलाय. नानाचं काम हे खरंच खूप मोठं आहे. चित्रपटच नव्हे तर समाजकार्यात सुध्दा त्यांचं योगदान आहे. तनुश्रीने जे काही आरोप केलेत त्यांतून नानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे कुठलेही आरोप करण्याआधी शंभर वेळा विचार करा. आपण काय बरळतोय. याचं भान बाळगा, असं केसरकरांनी सूचित केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version