निवडणूक जवळ आली असली तरी राष्ट्रवादीची गळती कमी होण्याचे काही चित्र दिसत नाही आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. ऐन निवडणूकीच्या वेळी कार्यकर्त्याने नव्हे तर चक्क उमेदवारानेच राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार नमिता मुंडदा यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. भाजपच्या संगीत ठोंबरे यांचा पत्ता कट झाल्याचं बोलंलं जात आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंदडा यांच्या उमेदवारीची घोषणा करत केज मतदार संघातून उमेदवारीचे तिकीट दिले होते. केजमधून उमेदवारी देण्याचं आश्वासन भाजपनं त्यांना दिलं आहे. त्यांच्या ऐन वेळी पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. राज्याच्या मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या नमिता सूनबाई आहेत.
2014 साली नमिता मुंदडा यांनी निवडणुक लढवली होती. परंतु यामध्ये त्यांचा तब्बल 40.000 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपाच्या संगीत ठोंबरे यांनी त्यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात आणि मुंदडा यांच्यात बेबनाव असल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला असे बोलले जात आहे. यांचा बेबनाव अनेक कार्यक्रमांतून समोर आलं आहे. भाजपच्या संगीत ठोंबरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता, पराभवानंतरही राष्ट्रवादीनं त्यांना पुन्हा संधी दिली होती
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.