जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
कॅन्सरशी झुंज देणाऱ्या नमिता कोहक यांनी नाशिकच्या शिरपेचात तुरा रोवला आहे. अमेरिकेमध्ये पार पडलेल्या मिस ग्लोबल युनायटेड 2017 हा किताब त्यांनी पटकावला.
देशातील ज्या महिला आपल्या शक्तीचा उपयोग करत समाजसेवा करतात त्यांच्यात ही स्पर्धा पार पडते. मुख्यतः ज्या महिला कॅन्सर या आजाराशी निगडित कार्य करतात त्यांच्या सहभाग या स्पर्धेत अधिक असतो.
नमिता कोहक या भारतातील पहिला महिला आहे ज्यांनी मिस ग्लोबल युनायटेड 2017 या ‘किताब पटकावला. मी पुढे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कार्य करत राहणार असल्याचं नमिताने सांगितलं. त्यांनी या स्पर्धा जिंकल्यानं महाराष्ट्रासह नाशिकचं नावही उंचावलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.