‘वांद्रे-वर्सोवा लिंकला सावरकरांचे नाव द्या’

‘वांद्रे-वर्सोवा लिंकला सावरकरांचे नाव द्या’

मुंबईतील कोस्टर रोडल छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याबाबत केलेल्या पाठपुराव्याल यश आले आहे. त्यानंतर आता वांद्रे – वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहीत ही मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना महापुरूष, महानीयांची नावे देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले होते. पत्रामध्ये मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांचे नाव, वांदे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांचे नाव देण्याची मागणी केली फडणवीसांनी केली.

दरम्यान, महापुरुष, महनीयांच्या कार्याची येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यानंतर मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version