फक्त चार रुपयांसाठी घेतला लाखमोलाचा जीव

फक्त चार रुपयांसाठी घेतला लाखमोलाचा जीव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कित्येकदा छोट्याशा कारणावरुन देखील अनेकजण टोकाची भूमिका गाठताना दिसतात. असाच एक प्रकार नालासोपारा पूर्वेला दुबे इस्टेट परिसरात रात्री 1 च्या दरम्यान घडलाय.

गोरखनाथ भागवत व त्याचा मित्र किशन अंडापाव खाण्याकरिता टपरीवर गेले असता दोघांनी 12 रुपयांप्रमाणे 2 अंडापाव विकत घेतले.

पण, त्यांनी विक्रेत्याला 24 रुपये देण्याएवजी फक्त 20 दिले. विक्रेता राजूने त्यांच्या जवळ आणखी 4 रुपयांची मागणी केली असता दोन्ही मित्रांनी वाद घातला.

अखेर या भांडणाचा अंत गोरखनाथ यांच्या मृत्यूने झाला. राजूने आपल्या जवळ असलेला कांदा कापायचा चाकू मयत गोरखनाथ भागवतच्या पोटात खुपसला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय.

तुळींज पोलीस घटना स्थळी दाखल झाली असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहेत. आरोपी राजूसह या भांडणात सहभागी असलेला सोनू या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या वर 302 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version