महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटके पकडली. ही सगळी स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
या संदर्भातले ट्विटच जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ‘महाराष्ट्रात अराजक माजेल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती ‘असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
वैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून ATS ने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता. — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 10, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.