नागपूर : नागपूरमध्ये वर्दीत पोलीस उडत्या चालींच्या हिंदी गाण्यांवर नाचत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे समजते. कर्तव्यावर असताना वर्दीतल्या व्यक्तीने हे वर्तन करणे योग्य की अयोग्य यावरुन समाजमाध्यमात चर्चेला उधाण आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.