जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
महिलांचा पुढाकार प्रत्येक क्षेत्रात किती मोठा आहे हे आज नागपुरात पाहायला मिळालं. नागपूर स्थानकावरून सुटणारी नागपूर ईटारसी इंटरसिटी एक्स्प्रेस या गाडीचं संचालन पूर्ण पणे महिलांनीच केलं. एक्स्प्रेस सुरू होण्यापासून ते नागपूर स्थानकावरून निघे पर्यंत सगळा कारभार हा आज महिलाच पाहणार आहेत. तिकीट चेकर, गार्ड, हिरवा झेंडा दाखवणे हे काम सुद्धा आज महिलाच पाहणार आहेत.
नागपूर स्थानकावरून सुटणारी नागपूर ईटारसी इंटरसिटी एक्स्प्रेस हि गाडी चालविण्यासाठी चालक माधुरी उराडे गाडी सज्ज झाल्या आहेत तर त्यांच्या सहकार्यसाठी दुसऱ्या चालक सुद्धा महिलाच आहेत. या गाडीत तिकीट चेकर सुद्धा महिला, गार्ड सुद्धा महिलाच आहेत. एवढंच कर तर या गाडीला हिरवा झेंडा दाखविणारी सुद्धा महिलाच आहेत.
नागपूर स्थानकावरून सकाळी सुटणाऱ्या या गाडीत प्रवाश्यांची मोठी गर्दी असते. मात्र आज सर्व महिला मोठ्या खुबीने हे सगळं कर्तृत्व निभवताना दिसत आहेत. गार्डची सुरक्षेची भूमिका ही सगळ्यात महत्वाच्या असतात मात्र या सगळ्या भूमिका सुद्धा महिला मोठ्या चांगल्या पद्धतीने आणि जिम्मेदारीने निभावतात ही खरच महिलांचा सन्मानाची हूी बाब असली तरी महिला सुद्धा किती चांगल्या प्रकारे सर्व क्षेत्रात काम करू शकते हे यावरून दिसून येते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.