जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. एक नाही तर तब्बल दीडशे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
डीनने परिक्षेला बसू दिलं नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठी दुर्घटना टळली.
नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात ही धक्कादायक घटना घडली. महाविद्यालयानं दीडशे विद्यार्थ्यांना परिक्षेला बसण्यासाठी मज्जाव केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.