जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपूरच्या ग्रामीण भागात भूमाफियाच्या काळ्या कारनाम्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढावली आहे.
अवैध सावकारी आणि धाक दपटशाहीचा वापर करत डझनावार शेतकऱ्यांची भूमाफियानं फसवणूक केली.
नागपूर पोलिसांनीही या भूमाफियाला संरक्षण देत शेतकऱ्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली. इसापूर गावात राहणाऱ्या आणि पंचाहत्तरी ओलांडलेल्या वानखेडे दाम्पत्यावर आत्महत्या करण्याची वेळ ओढावली.
शेतीच्या एका तुकड्याचे गहाणपत्र तयार करण्याच्या नावाखाली खेमराज वानखेडे या शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. शेतात राबणाऱ्या या शेतकऱ्याच्या अंध मुलावर आता एसटी बस स्थानकावर चॉकलेट आणि बिस्किट विकण्याची वेळ ओढावलीय.
हे कुटुंब जिल्हाधिकारी आणि तसंच पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पायऱ्या झिजवतंय. पण, तिथूनही त्यांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.