लिफ्टच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

लिफ्टच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   

 

सामूहिक बलात्काराने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. लिफ्टच्या बहाण्याने फॉर्च्युनर गाडीत दोघांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 

 

पुणे जिल्ह्यातील शिंदवणे घाटात ही घटना घडली आहे. उरुळी कांचन – जेजुरी मार्गावर हवेली तालुक्यात शिंदवणे घाट आहे.

 

या घाटात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर संबंधित महिलेने घाटातूनच निघालेल्या दोन दुचाकीस्वारांच्या मदतीने फॉर्च्युनरचा नंबर मिळवून,

लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस सध्या पुढील तपास करीत असून, फॉर्च्युनरवाला नेमका कोण हे लवकरच समोर येण्याची चिन्हं आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version