जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूरच्या बजाजनगर पोलीस हद्दीत एका इसमाची हत्या करण्यात आलीय. गेल्या तीन दिवसातील ही तिसऱी हत्या असल्याने नागपुरात खळबळ उडालीय. मोरेश्वर वानखेडे असं हत्या केलेल्या इसमाचं नाव असून ते प्राचार्य होते. निरी गेटसमोर अज्ञातांनी त्यांच्यावर तलवारीने वार करून त्यांची हत्या केलीय.
या हत्येचं नेमकं कारण समोर आलं नसून जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. याआधीही नागपुरातल्या वाड़ी आणि जरीपटका भागात दोघांची हत्या झाली होती. त्यामुळे दिवसाढवळ्या होणाऱ्या या हत्यांच्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडालीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.