नाशिकच्या रंगपंचमीला ऐतिहासिक महत्व

नाशिकच्या रंगपंचमीला ऐतिहासिक महत्व

जय महाराष्ट्र, नाशिक

राज्यातल्या इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात रंगपंचमीला ऐतिहासिक महत्व आहे. शहरात पेशवेकालीन पाच मोठे हौद आहेत. ज्यांना नाशिकमध्ये ‘रहाड’ म्हणतात. शहरातील या पाच हौदांमध्ये उडी घेतल्याखेरीज नाशिककरांची रंगपंचमी साजरी होत नाही. होळीनंतर साजरी होणारी रंगपंचमी नाशिकमध्ये विशेष असते.

नाशिकमध्ये पेशवेंनी शहराच्या प्रमुख भागांमध्ये सोहळा हौद तयार केले आहेत. त्यात आता पाच हौद अस्तित्वात आहेत. प्रत्येक रंगपंचमीला हे हौद उघडून त्यात रंगाचं पाणी भरून त्यात नाशिककर रंगपंचमी खेळतात. शहरात असलेल्या पेशवेकालीन हौदांचा ढापा एक दिवस आधी उघडला जातो. सकाळपासूनच रंग गडद करण्याचं काम सुरु होत. मग मानकऱयांच्या हस्ते या हौदांचं पूजन करून हे हौद उघडले जातात. हौद उघडल्यानंतर यात पहिली डुबकी मानकरी लावतात आणि मग रंगपंचमी सुरु होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version