केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याचा रस्ता शेतातून काढल्यानं शेतकऱ्याच्या कपाशीच्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान

केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याचा रस्ता शेतातून काढल्यानं शेतकऱ्याच्या कपाशीच्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

नागपुरात केंद्रीय कोळसा खाणमंत्री हरिभाऊ चौधरी यांच्या दौऱ्यासाठी चक्क शेतकऱ्यांच्या पिकातून रस्ता काढल्याची बाब समोर आलीय.

या रस्त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे जवळपास पन्नास हजारांचे नुकसा झाल्याचं कळतंय. सावनेर तालुक्यातील भानेगाव परिसरात 131 हेक्टर परिसरात वेकोलीची खान आहे.

2007मध्ये सरकारी करारनाम्यानुसार स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या.

शेतकरी देवराव ढोकेंचा करारनामा झाला पण त्यांना अद्यापही मोबदला मिळत नसल्यानं त्यांनी जमीन कसन सुरुच ठेवलं होतं.

या हंगामात त्यांनी कापशी लावली होती. मात्र केंद्रीय कोळसा खाणमंत्री हरिभाऊ चौधरी यांच्या दौऱ्यासाठी त्यांच्या शेतातून रस्ता केल्यानं शेतकरी देवराव ढोकेंचं मोठं नुकसान झालंय. मात्र खाण कंपनी यावर आता काहीच बोलायला तयार नाहीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version