जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपुरात बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलंय. मृतदेहाची ओळख पटली असून मयत व्यक्तीची मुलगी आणि जावई बेपत्ता आहेत. प्रतापनगरात राहणाऱ्या किरण शिव या महिलेनं आपल्या पतीच्या मदतीनं वडिलांचा खून केला.
या दोघांनी दुर्गानगर स्टॅण्डवर रिक्षा पकडली आणि चालकाला रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितलं. मात्र, बॅगचा जडपणा आणि दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं रिक्षाचालकानं त्याबाबत विचारणा केली.
यामुळे घाबरल्यानं दोघांनी बॅग तिथेच ठेवून माटे चौकातून पसार झाले. यानंतर रिक्षाचालकाने राणा प्रतापनगर पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
तर, जमीनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली असावी अशा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.