नागपुरात बोगस लाभार्थी दाखवून लाटलं अनुदान; ग्रामसेवकानं लुटलं शौचालयाचं अनुदान

नागपुरात बोगस लाभार्थी दाखवून लाटलं अनुदान; ग्रामसेवकानं लुटलं शौचालयाचं अनुदान

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात खोटे लाभार्थी दाखवून अनुदान लाटल्याचा आणखी एक घोटाळा उघडकीस आलाय.

या संदर्भातील कागदपत्र जय महाराष्ट्रच्या हाती लागलंय. नागपूर जिल्ह्यात मांढल ग्रामपंचायतमध्ये दलित वस्ती आरोग्य,पोषण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता योजना 2016-17 मध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाने संगनमत करून बोगस लाभार्थी दाखवून शौचालयाचे अनुदान लाटले.

माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार घर नसतांना ही एका कुटुंबातील दोन लोकांना लाभार्थी म्हणून दाखवण्यात आले. इतकच नाही तर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना देखील लाभार्थी बनविण्यात आले.

महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदच्या बेसलाईन सर्वे यादीच्याच्या बाहेरील मोठया संख्येनं गैर दलितांना लाभार्थी दाखवून हा घोटाळा करण्यात आलाय. हा संपूर्ण घोटाळा माजी सरपंच आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेश तिवसकर यांनी केल्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version