नाम फाऊंडेशनकडून दिवाळीच्या निमित्ताने ग्रामस्थांना आर्थिक मदत

नाम फाऊंडेशनकडून दिवाळीच्या निमित्ताने ग्रामस्थांना आर्थिक मदत

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड  

दिवाळीनिमित्त नाम फाउंडेशने नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मायेचा आधार देत आर्थिक मदत केलीय. कंदार तालुक्यातील अठरा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नाम फाऊंडेशनने साडीचोळी आणि पंधरा हजाराचा धनादेश देऊन भाऊबिजेची ओवाळणी दिली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. हंसराज वैद्य, नायब तहसीलदार वडवळ आणि पांडुरंग कंधारे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली. नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद आनासपुरे हे नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतात. अशा भावना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version