महाराष्ट्रात उभारणार म्हैसुरचे भव्य फुल मार्केट

महाराष्ट्रात उभारणार म्हैसुरचे भव्य फुल मार्केट

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

राज्यभरात दिवसेंदिवस फुलांची आवाक वाढताना दिसत आहे याचा विचार करुन म्हैसुरच्या धर्तीवर मिरजेत फुलाचे मार्केट उभे राहणार आहे.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक कोटींची तरतुद करण्यात आली.

 

सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फुलाची शेती केली जाते. त्यांना बाजार पेठ निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त शेतकारी फूल शेतीकडे वळावेत यासाठी मार्केट कमिटीने हा निर्णय घेतला.

 

सध्या हा प्रस्ताव मंजूरीसाठी पणन मंडळाकडे पाठवण्यात आला असं सभापती प्रशांत शेजाळ यांनी सांगितले. त्यामुळे लवकरचं महाराष्ट्रात फुलांचे मार्केट उभे राहिल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version