विधानपरिषद विरोधीपक्ष नेतेपद शिवसंग्रामला द्यावं- विनायक मेटे

विधानपरिषद विरोधीपक्ष नेतेपद शिवसंग्रामला द्यावं- विनायक मेटे

मुंबई : विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेतेपद शिवसंग्राम पक्षाला देण्यात यावं, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी केली आहे. मी स्वत: वरिष्ठ असून मला विरोधीपक्ष नेतेपद द्यावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.

पाच वर्षे भाजपने आमच्यावर अन्याय केला. असे असले तरी आजही आम्ही त्यांच्यासोबतच आहोत, भविष्यातही राहू अशी भूमिका त्यांनी घेतली. आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपच्या पंकजा मुंडे, सुरेश धस यांचही नाव चर्चेत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु महाविकास आघाडीने सरकार स्थापन केल्याने भाजपला विरोधात बसावं लागले आहे. विधानसभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version