मविआ आगामी निवडणुका एकत्र लढणार – अजित पवार

मविआ आगामी निवडणुका एकत्र लढणार – अजित पवार

छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस या तिनही पक्षांचे बडे नेते उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगावर खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे आत शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयाची असल्याचे पवार म्हणाले. आता एकाच हातात घड्याळ, पंजा आणि मशाल आहे. मविआ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसा विधानसभा निवडणुका सोबत लढणार आहे. त्यामुळे पेटून उठावे लागेल, असे अजित पवार म्हणाले.

‘शेवटीची आशा सर्वोच्च न्यायालयच’

अजित पवार म्हणाले, राज्याच्या संपूर्ण विभागात महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. मविआचे सरकार सत्तेवर असताना मविआची सभा घेणार होतो, मात्र कोरोनाकाळात आणि त्यानंतर राज्यातील घडामोडीमुळे सभा रखडल्या. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार आहे. सरकारची इच्छाशक्ती कमजोर आहे. निवडणूक आयोगही निर्णय देत नाहीत. त्यामुळे आता शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयाकडून आहे, असे अजित पवार म्हणाले.

‘हिंमत असल्यास सावरकरांना भारतरत्न द्या’

सरकारकडून मराठवाड्यातील जनतेचा सातत्याने अपमान झाला असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेना-भाजपाची सावरकर गौरव यात्रा निघाली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यावेळी त्यांची दातखील बसली होती का? त्यावेळी गौरव यात्रा का काढली नाही, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला सर्व महापरुषांचा आदर आहे. मात्र, सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. हिंमत असल्यास सावरकरांना भारतरत्न द्या, असेही अजित पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version