बर्फात स्कीइंग करण्याचा आनंद लुटावा अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यातही तो विशिष्ट पोशाख परिधान करायला मिळणं म्हणजे डबल धम्मालच. अशातच सध्या इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या एक व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. यात एक महिला स्कीइंगचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घेताना दिसत आहे. या महिलेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेचे नाव दिव्या मैय्या आहे. दिव्याने या व्हिडिओत चक्क साडी नेसून स्कीइंग करण्याचा अनुभाग घेतलाय. तिने हा अनुभव वेल्चच्या पर्वत रांगांमध्ये घेतला.हा अनोखा प्रकार पाहून नेटकरी भारावून गेलेत आणि त्यामुळेच हा विडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे आणि ती स्कीइंग चा आनंद लुटणाना दिसत आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.