परभणी, १० जून २०२३, प्रतिनिधी : परभणी जिल्हयातील पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीतील उखळद-नयागढ मार्गावर पिंपरी-देशमुख या गावाहुन डुक्कर पकडण्यासाठी जाणाऱ्या तीन तरुणांवर मुसलमान टोळीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. काहीही शहानिशा न करता चोर ठरवत ही मारहाण करण्यात आल्याचे पीडित तरुणाचे कुटुंबीय सांगत आहेत. सर्व पीडित शीख समुदायातील भटक्या – विमुक्त गटाचे असून ते वराहपालक आहेत. त्याचाच राग बाळगून ही घटना झाल्याचे सांगितले जातेय. त्यात १४ वर्षीय किरपालसिंग भोंड या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर, गोरसिंग दुधानी आणि अरुणसिंग टाक हे दोघे जायबंदी झाले आहेत. त्यांच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच भटके विमुक्त विकास परीषदेचे जिल्हा संयोजक गोविंद भंडे यांनी पीडितांसह कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणात उखळदचे माजी सरपंच अक्रम पटेलसह सात जणांना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये सय्यद एजाज सय्यद इब्राहिम, सय्यद अकरम सय्यद अगामिया, सय्यद तोहिद सय्यद संमदर, सय्यद फजलू सय्यद अली, शेख जावेद शेख पिरमिया, रामा बाबाराव जुमडे, पाशा खान उर्फ बाबाखान पि. अफजल खान यांचा समावेश आहे. तर, अनेक संशयित फरार असल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.