रस्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं असं नाही; राष्ट्रवादीच्या आंदोलनावर चंद्रकांत पाटलाची टीका

रस्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं असं नाही; राष्ट्रवादीच्या आंदोलनावर चंद्रकांत पाटलाची  टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेल्फी विथ खड्डा या सोशल मीडियावरील आंदोलनाला सुरुवात झालीय असे असतानाच रस्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असं विधान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय.

पाऊस पडला की खड्डे पडतात. याआधीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राला भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळे जास्त टिकतील असे रस्तेच बनले नाहीत परिणामी हे खड्डे जुनेच असून नव्याने खड्डे पडले असं काही नाही असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version