जय महाराष्ट्र न्यूज, बीड
बीडमध्ये शेतकरी कर्ज मुक्तीसाठी शिवसेनेच्या महिलांनी मुंडन करत सरकारचा निषेध केला. कर्जच्या बोजानं कुंकू सुरक्षित रहावे म्हणून चक्क महिलांनी वट सावित्री पौर्णिमेच्या आदल्यादिवशी मुंडन केलं.
तसंच कापलेले केस मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देणार आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी महिलांनी मुंडन करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. गेल्या काही दिवसापासून शेतकरी संपावर असून सरकार दखल घेत नसल्यानं शिवसेना महिला आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.