5 तरुणींशी लग्न करुन फसवणूक करणाऱ्या ठगाला तरुणीचा इंगा

5 तरुणींशी लग्न करुन फसवणूक करणाऱ्या ठगाला तरुणीचा इंगा

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या ठगाला तरुणीनं ताब्यात घेतलं आहे. जलालुद्दीन नाडकर असं या ठगाचं नाव आहे.

 

मेट्रीमोनिअल साईटवरुन त्याची पिडीत तरुणीशी ओळख झाली होती. नाडकरची 5 लग्न आधीच झाली असल्याची माहिती पिडीतेला समजली. मात्र, तरीही तिनं नाडकरसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

 

एवढं होऊनही आरोपी नाडकर तिला हुंड्यासाठी मारहाण तसंच मानसिक छळ करत असे. एवढंच नाही तर नाडकर कुर्ल्यातील एका तरुणीसोबत साखरपुडा करत असल्याची माहिती पिडीतेला मिळाल्यावर मात्र तिचं रक्त खवळलं आणि तिनं आरोपीला मुंब्र्याच्या घरात घुसून मारहाण केली. दरम्यान, आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version