आता ‘एवढ्या’ चौ.फुटापर्यंत मालमत्ता कर नाही – मुख्यमंत्री

आता ‘एवढ्या’ चौ.फुटापर्यंत मालमत्ता कर नाही – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकांचा राज्यातील चौथा आणि शेवटचा टप्पा 29 एप्रिलला पार पडणार आहे. या टप्प्यामध्ये मुंबईतही मतदान होणार असल्याने उत्तर – पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. उत्तर – पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजनान कीर्तिकर यांच्या प्रचारसाठी सभा घेतली होती. या सभेवेळी सामन्य मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी खुशखबरी जाहीर केली आहे.

काय आहे खुशखबर ?

मुंबईत आपल्या हक्काचे घर असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.

500 चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मुंबईत मालमत्ता कर लागणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तसेच 2011 पर्यंतच्या प्रत्येक झोपडपट्टीधारकाला मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

पहिल्यांदा रेल्वेसाठी मोठी निधी मोदी सरकारने जाहीर केला आहे.

तसेच कागदावरील कामे आता प्रत्येक्षात पूर्ण होत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मेट्रो, कोस्टल रोड, वांद्रे- वर्सोवा लिंक रोड अशी कामे पार पाडली.

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version