मुंबईच्या या भागांमध्ये होणार 24 तास पाणीपुरवठा

मुंबईच्या या भागांमध्ये होणार 24 तास पाणीपुरवठा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेने आता ठोस पावले उचलली आहेत.

सांताक्रूझ ते वांद्रे उपनगरांमधील पश्चिम भागात तसेच मुलुंडमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या सुधारण्याच्या तांत्रिक कामाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली आहे.

उच्चभ्रू वस्तीचा भरणा असलेल्या या दोन्ही प्रभागांमध्ये साधारण सात लाख लोक असून या प्रयोगाचा फायदा येथील बैठय़ा वस्त्यांनाही मिळणार आहे.

जून महिन्यापर्यंत या दोन्ही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version