Mumbai Viral Girl: एकटीच उभी राहिली पोलिस व्हॅनसमोर, मुंबईच्या तरुणीने जिंकली नेटकऱ्यांची मने; तरूणी नेमकी आहे तरी कोण?

तिच्या या कृतीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकांकडून तिच्या धैर्याचे कौतुक केले जात आहे.
Mumbai Viral Girl: एकटीच उभी राहिली पोलिस व्हॅनसमोर, मुंबईच्या तरुणीने जिंकली नेटकऱ्यांची मने; तरूणी नेमकी आहे तरी कोण?

NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन सुरू असताना मुंबईतील एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दादर येथील शिवाजी पार्क परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान या तरुणीने पोलिसांची व्हॅन थांबवण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृतीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकांकडून तिच्या धैर्याचे कौतुक केले जात आहे.

दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू झालेल्या NEET आंदोलनाची लाट देशातील विविध शहरांमध्ये पोहोचली आहे. मुंबईतही विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.

याच वेळी रिया यादव नावाची तरुणी पुढे आली आणि पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहिली. हातात मोबाईल असतानाच तिने एका हाताने व्हॅन पकडून ती पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. काही वेळ ती व्हॅनसमोर ठामपणे उभी राहिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ उपस्थित विद्यार्थ्यांपैकी एका व्यक्तीने शूट केला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर वेगाने पसरला. अनेक युजर्सनी रियाच्या कृतीचे कौतुक करत तिला ‘सुपरगर्ल’ म्हटले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये रिया पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करताना दिसते. “पोलिस आपले काम करत आहेत, मात्र ते जबाबदारीने केले पाहिजे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारीही त्यांचीच आहे,” असे ती म्हणताना दिसते. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध कायम ठेवला. दरम्यान, रिया यादवचा व्हिडिओ आणि तिची भूमिका सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेमुळे NEET आंदोलनाला आणखी प्रसिद्धी मिळाल्याचे दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version