रेल्वे कर्मचाऱ्यांची मुजोरी; प्रवाशांना शिवीगाळ आणि दादागिरी

रेल्वे कर्मचाऱ्यांची मुजोरी; प्रवाशांना शिवीगाळ आणि दादागिरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकारी कर्मचाऱ्यांनी निदान कामं करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य ठेवतात. पण सर्वसामान्यांची कामं तर सोडा हे कर्मचारी किती मुजोरी करतात याचंचं उदाहरण वसई

रेल्वे स्टेशनमध्ये समोर आले आहे.

 

तिकिट खिडकीवर काम करणारी महिला कर्मचाऱ्याची दादागिरीच कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. 14 जूनला घडलेली ही घटना पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

 

वसई स्टेशनमध्ये असणाऱ्या तिकिट काऊंटरवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यानं चक्क महिला प्रवाशावरच दादागिरी केली. नम्रता या महिला कर्मचाऱ्यानं अर्वाच्य भाषेत दादागिरी आणि शिवीगाळ केल्याचं समोर आले.

 

महिला प्रवाशाने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्यानं हे समोर आले. रांगेत असूनही नम्रताने त्या महिलेला तिकीट देण्यास नकार दिला. एवढंच नाही तर दादागिरी करणाऱ्या नम्रताने ट्रेनमध्ये जाऊनही त्या महिलेशी दादागिरी केली. तिला दमदाटी करून चैन पुलिंगही केली.  या घटनेनंतर नम्रताने तेथील नोकरी सोडली आहे. मात्र या प्रकरणात तिकीट घेणाऱ्या महिलेची चूक असून, तिने तिकीट विंडोची काच फोडली असल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version