जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
परीक्षांचे रखडलेले निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठानं कॉलेजांना दिलेली सुट्टी 31 जुलैपर्यत वाढवली. परीक्षांचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठ आता हातघाईवर
आले आहे.
याआधीच 24 जुलैपासून 4 दिवस कॉलेजांना सुट्टी देण्यात आली होती. पेपर तपासण्यासाठी नागपूर विद्यापीठाचीही मदत घेण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याची डेडलाईन विद्यापीठाच्या डोक्यावर आहे. त्यामुळेच मुंबईतली कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात
आला. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचं मात्र नाहक नुकसान होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.