मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील निकालासाठी घेणार सीए प्राध्यापकांची मदत

मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील निकालासाठी घेणार सीए प्राध्यापकांची मदत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ऑगस्ट उजाडूनसुद्धा 150हून अधिक निकाल मुंबई विद्यापीठानं जाहीर केले नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांपैकी बहुतेक निकाल हे कॉमर्स शाखेचे आणि लॉ चे आहेत.

 

त्यामुळे विद्यापीठ प्रशासनानं आता कॉलेजांमध्ये प्राध्यापक म्हणून शिकविणाऱ्या ‘सीए’ची मदत घेणार आहेत. त्यादृष्टीनं एकूण 83 जणांची टीम कार्यरत झाल्याची माहिती समोर आली.

 

याबाबत कुलगुरू डॉ. संजय देशमुख आणि परीक्षा व मूल्यामापन संचालक दीपक वसावे यांच्याबरोबर विशेष बैठक झाली असून त्यानुसार या ‘सीए’ना पत्रेही देण्यात आल्याची माहिती आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version