मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची नियुक्ती, पाच नावे राज्यपालांकडे रवाना

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची नियुक्ती, पाच नावे राज्यपालांकडे रवाना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यभराचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंसाठी अंतिम पाच नावे शनिवारी निश्चित करण्यात आली. ही नावे शनिवारी दुपारी शोध समितीमार्फत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये कोणत्या नावांचा समावेश आहे, याबाबत शनिवारी दिवसभर तर्कवितर्कांना उधाण आले होते.

येत्या दोन-तीन दिवसांत अंतिम निवड झालेले पाचही जण कुलपतींकडे सादरीकरण करणार असून त्यानंतर अंतिम नाव जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे कुलगुरूपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या पाच जणांमध्ये नागपूर विद्यापीठाचे प्रमोद येवले तसेच रुईया कॉलेजचे सुहास पेडणेकर यांचे नाव असल्याचे समजते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version