जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विद्यापीठाच्या ऑनलाईन असेसमेंटचा बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसला आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालांपैकी अनेकांना शून्य टक्के मिळाले आहेत.
काही निकालात चुका असल्याची टिकाही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनाचा पर्याय निवडला आहे.
यावर्षी 50 हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आधीच निकालासाठी विद्यार्थ्यांची लटकंती झाली असतांना आता पुनर्मूल्यांकनासाठी आणखी वेळ जाणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.