जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई विद्यापीठाचा गोंधळ काही संपता संपत नाही. सिनेट निवडणुकीतील नोंदणीचे 50 हजार शुल्क मुंबई विद्यापीठाने परत केले
नसल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव रवींद्र साळवें यांनी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.
मुंबई विद्यापीठानं नोंदणी केल्यानंतर सिनेटच्या निवडणुका राज्य शासनानं रद्द केल्या होत्या. अर्ज ‘अ’ अंतर्गत 2 हजार 521 आणि ‘ब’
अंतर्गत 2 हजार 492 असे एकूण 5 हजार 13 अर्ज प्राप्त झाले होते. मात्र निवडणुका रद्द केल्यानंतरही जमा झालेले शुल्क परत केले नाही,
अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव रवींद्र साळवेंनी अनिल गलगलींना दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.