मुंबई : मुंबई विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान–तंत्रज्ञान, मानव्यविज्ञान आंतरविद्याशाखीय आणि चार या शाखांमधील अधिष्ठाता पदांची दोन ते अडीच वर्षांपासून भरती झाली नव्हती. मात्र, आता या चार विद्याशाखांमधील अधिष्ठाता पदांसह एकूण १५२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना ७ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. पदभरती न झाल्यामुळे काही प्राध्यापकांकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.