मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेत पुरवणी मिळणार नाही

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेत पुरवणी मिळणार नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पुरवणी न देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. ऑनलाईन मूल्यांकनादरम्यान पुरवण्या गहाळ झाल्यानं हजारो विद्यार्थ्यांचे निकाल अजूनही रखडलेत. त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.

तसेच 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 40 पानं पुरेशी असल्याचंही विद्यापीठानं म्हटलंय.

याबाबत महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना परिपत्रक पाठवले असून, द्वितीय सत्राच्या परीक्षांसाठी कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यात येणार नाही, असे जाहीर करण्यात आलंय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version